Breaking News

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

मन,मेंदू व मनगट बळकट करणाऱ्या शिक्षणाची गरज : प. पू. स्वामी विवेकानंद शिक्षणचे संचालक पृथवीसिंह नाईक

 शिराळा प्रतिनिधी

 आज मन मेंदू व मनगट बळकट करणार्‍या शिक्षणाची गरज आहे

असे प्रतिपादन प पू स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संचालक पृथ्वीसिंग नाईक यांनी केले श्री छत्रपती माध्यमिक विद्यालय व स्व. वसंतराव बाबा नाईक जुनियर कॉलेज ऑफ सायन्स शिराळा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य विठ्ठल नलवडे होते 

यावेळी युवा  पृथ्वीसिंग नाईक (बाबा) यांना नॅशनल युथ गोल्डन अवार्ड 2020 हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार . प्राचार्य विठ्ठल नलवडे हस्ते शाल श्रीफळ व बुके देऊन करण्यात आला. तसेच कॉलेजचे प्राचार्य  विठ्ठल नलवडे यांना दि प्राईड ऑफ महाराष्ट्र गौरव 2020 हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार प्रा प्रशांत पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बुके करण्यात आला. यावेळी अशोक कुभांर  म्हणाले . पृथ्वीसिंग नाईक  यांनी साहित्यिक, कला, क्रिडा, सामाजिक, सांस्कृतिक व लॉकडाउनच्या जनतेला मद्दत केली, अशा विविध क्षेत्रात केलेल्या   त्यांच्या कार्यातून प्रेरणा विद्यार्थी घेऊन समाजासाठी काहीतरी करावे. या कार्यक्रमाचे आभार एस. एन. जाधवर  यांनी मानले यावेळी  पर्यवेक्षक एस वाय यादव ज्युनियर विभाग प्रमुख एस एम पाटील. गणित विभाग प्रमुख एस एम पाटील ,प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments