*'भैरव पुराण' स्कंद पुराणावर आधारित महत्वाची रचना: पद्मश्री प्रो. काशिनाथ पंडिता *
पद्मश्री आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहासकार प्रा. काशिनाथ पंडिता यांच्या प्रमुख उपस्थितित ' भैरव पुराण ' या वाळवा तालुक्यातील साखराळे येथील युवा लेखक श्री शशांक कुलकर्णी लिखित आगामी प्रकाशित होत असलेल्या संशोधनात्मक ग्रंथावर जम्मू येथील त्यांच्या निवासस्थानी चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रो. पंडिता म्हणाले की, भैरव पुराण… स्कंद पुराणावर आधारित ही एक महत्त्वपूर्ण रचना आहे. स्कंद पुराणात भैरव महात्म्य स्कंद-अगस्त्य संवादाद्वारे प्रकट होते. या ग्रंथाच्या माध्यमातून तरुण लेखक श्री. शशांक कुलकर्णी यांनी यावर महत्वपूर्ण संशोधन केले आहे जे अत्यंत अर्थपूर्ण आणि विचार करण्यासारखे आहे. त्याचा अनुभव या पुस्तकाच्या प्रत्येक अध्यायात येतो. या पुस्तकात एकूण अकरा अध्याय आहेत. या अकराव्या अध्यायांतून, अगदी सोप्या, सुलभ पण मार्मिक भाषेत भैरवाचे कार्य, उत्पती, महात्म्य या ग्रंथातून प्रक ट होते. मला खात्री आहे की या युवा लेखकाने केलेले यशस्वी प्रयत्न अर्थपूर्ण ठरतील आणि भैरव पुराण या पुस्तकाच्या माध्यमातून श्री भैरवनाथांचे वस्तुनिष्ठ महात्म्य सर्वव्यापी होईल.
या चर्चेत जम्मू केंद्रीय विद्यापीठाच्या तुलनात्मक धर्म आणि सभ्यता केंद्राचे डॉ. अजय कुमार सिंह यांचाही सहभाग होता. यांनी या अत्यंत महत्त्वाच्या आणि अभ्यासू ग्रंथासाठी लेखकाचे विशेष अभिनंदन केले. भैरव पुराण हा संशोधनात्मक ग्रंथ वाळवा तालुक्यातील साखराळे येथील श्री शशांक कुलकर्णी यांनी लिहिला असून ते सद्या जम्मू काश्मीर येथील केंद्रीय विद्यापीठामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचा सीनिअर रिसर्च फेलो या नात्याने संशोधन करीत आहे. पुण्याच्या नावीन्य प्रकाशनातर्फे हा ग्रंथ प्रकाशित होत आहे. या चर्चेत लेखक श्री शशांक कुलकर्णी, शिवशाही फाउंडेशन चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री.बाळाराम माडकर,प्रवीणकुमार बैरागी, विनय शर्मा सहभागी होते.


0 Comments