शिराळा : येथे दत्त मंदिर ते मुलानी गल्ली पर्यंत तोरणा ओढ्यालागत संरक्षक भिंत बांधकामाचा श्रीफळ फोडून शुभारंभ आमदार मानसिंगराव नाईक यांनी केला. या कामासाठी नगरपंचायत निधीतून १६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी 'विश्वास'चे संचालक विश्वास कदम, संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष संपतराव शिंदे, नगराध्यक्ष सुनीता निकम, नगरसेवक किर्तीकुमार पाटील, सुनंदा सोनटक्के, संजय हिरवडेकर, मोहन जिरंगे, पृथ्वीसिंग नाईक, राजसिंह पाटील, के. वाय. मुल्ला, वाशीम मोमीन, राजू निकम, चंद्रकांत जाधव, सुनील कवठेकर, संतोष देशपांडे, वैभव हसबनिस, सुनील कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील, कुलदीप निकम, अविनाश जाधव, दिनेश हसबनिस, विकास शहा आदी उपस्थित होते.


0 Comments